वृश्‍चिकासन

वृश्‍चिकासन करताना सुरुवातीला एखाद्या नरम मॅटवर पालथे झोपावे. त्यानंतर दोन्ही हातांचे तळवे डोक्‍याजवळ सरळ न्यावेत आणि ते मॅटवर पसरलेल्या स्थितीत ठेवावेत. त्यानंतर पाय हळूहळू उलट्या बाजूने वर न्यावेत आणि सावकाश हातांच्या आधाराने संपूर्ण शरीर उचलण्याचा प्रयत्न करावा. पाय डोक्‍याला पुढे चिकटले पाहिजेत. हे आसन करायला अवघडच आहे; पण सावकाश थोड्या थोड्या स्टेप्स केल्या तर नक्कीच जमते. एकदम करायला जाऊ नये आणि मुख्य म्हणजे योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखालीच करावे. पाय पूणर डोक्‍याला चिकटल्यावर सावकाश श्‍वासोच्छ्वास सुरू ठेवावा. साधारण वीस सेकंद या स्थितीत राहावे, त्यानंतर सावकाश पूर्व स्थितीत यावे.

आसन पूर्ण झाल्यावर पद्मासनात बसून संथपणे श्‍वास चालू ठेवावा आणि मगच उठावे. या आसनामुळे पोटाच्या स्नायूंना, कमरेला, पाठीच्या कण्याला चांगला ताण बसतो. तसेच मांड्या आणि पायांनाही चांगला व्यायाम होतो. हाताचे, दंडाचे आणि तळव्यांचे स्नायू बळकट होतात. शीर्षासन आणि चक्रासनाने जे फायदे मिळतात, तेच या आसनातही मिळतात. मुख्य म्हणजे पोटासंबंधीचे सर्व आजार कमी होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)