वृध्द महिलेची फसवणूक करणाऱ्या नात्यातील व्यक्तीला पकडून न्यायालयीन पोलिसांनी केले दीघी पोलिसांच्या हवाली

दीघी पोलिसांनी त्याला केली अटक

पुण- मुलाच्या मृत्यूनंतर मिळणारी विम्याची रक्कम निरक्षर वृध्द महिलेचा विश्‍वास संपादन करून त्यांच्या हाताचे अंगठ्याचे ठसे घेऊन लांबविणाऱ्याला शिवाजीनगर न्यायालयाच्या चार क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ अटक करण्यात आली. तो त्या वृध्द महिलेच्या नात्यातील आहे. त्याने 16 लाख 52 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
विशाल बच्चू तामचीकर (रा. पिंपरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायाल्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. न्यायालयात कर्तत्यावर असलेले पोलीस नाईक अशिष अशोक पवार यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, फसवणूकीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी शिवाजीनगर न्यायालयाच्या चार क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ येणार आहे. त्यानुसार सापळा रचून तामचीकर याला
न्यायालयीन पोलिसांनी पकडले. गुन्हा दाखल असलेल्या दीघी पोलिसांच्या हवाली केले. न्यायालयातील पोलीस अक्षय धुमाळ, सुनील शिंदे, गुंगा जगताप, आझाद पाटील, आप्पा होळकर आणि संपत पारधी यांनी ही कारवाई केली. या प्रकरणात आणखी दोघांवर दीघी पोलिसात गुन्हा दाखल आहे. सन 2014 ते 2016 या कालावधीत ही घडली. बयो शिवराम रावळकर यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. विशाल हा फिर्यादींचा भाचा आहे. काही वर्षांपूर्वी फिर्यादींच्या मुलाच्या मृत्यू झाला. त्याच्या विमा पॉलिसेचे पैसे मिळणार होते. या पैशावर विशाल याचा डोळा होता. त्याने फिर्यादीच्या हाताचे ठसे घेऊन पैसे लांबविल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)