सातारा – शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पंताचा गोट परिसरात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्याने घरातील वृद्ध महिलेच्या गळ्याला चाकू लावून चोरी करण्याचा प्रयत्न केला. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रेखा विजय महाडिक (वय 65, रा. पंताचा गोट, सातारा) या रविवारी रात्री घरात काम करत होत्या. दरम्यान, त्यांच्या घराची बेल वाजल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता समोर एक व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून उभा होता.

त्याने त्याच्या हातातील चाकू रेखा महाडिक यांच्या गळ्याला लावून अंगावरील आणि घरातील सोन्याचे दागिने तसेच पैसे काढून दे, अशी धमकी दिली. त्यानंतर रेखा यांनी आरडाओरडा केल्यानंतर चोरटा पळून गेला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव ढेकळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)