वृद्ध आईवडिलांच्या देखभालीसाठी नेपाळमध्ये कायदा

काठमांडू (नेपाळ): वृद्ध आईवडिलांच्या देखभालीसाठी नेपाऴ सरकारने एक निर्णायक पाऊल उचलले आहे. त्यासाठी एक कायदा बनवण्यात येत आहे. या कायद्यानुसार मुलांना आपल्या उत्पन्नातील एक ठरावीक भाग आईवडिलांच्या खात्यात जमा करणे अनिवार्य होणार आहे.

नेपाळ सरकारचे प्रवक्ते आणि माहिती व प्रसारण तंत्रज्ञान मंत्री गोकुळ प्रसाद यांनी या बाबत माहिती दिली आहे. ज्येष्ठ नागरिक अधिनियम 2006 मध्ये दुरुस्तीसाठी संसदेत एक ठराव मांडण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुरक्षित आणि सुखद व्हावे हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. लाखो रुपयांची संपत्ती असूनही मुले आपल्या आईवडिलांशी दुर्व्यवहार करत असल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. समजावून सांगूनही त्यांच्यात काही बदल होत नाही. आईवडिलांकडे दुर्लक्ष करणाऱ्या, त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या अशा वृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी हा कायदा बनवण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नेपाळमध्ये 60 वर्षांवरील नागरिकांना ज्येष्ठ नागरिक मानण्यात येते. नवीन कायद्यानुसार मुलांनी आपल्या आईवडिलांची देखभाल करायची आहे आणि त्यासाठी ठरावीक रकमेची व्यवस्था करणे अनिवार्य होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)