वृद्धिमान साहा दुखापतीमुळे कसोटीला मुकणार? 

नवी दिल्ली – आयपीएलच्या अकराव्या हंगामात भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा जायबंदी झाला आहे. आयपीएलमध्ये साहा सनरायझर्स हैदराबाद या संघातून खेळत होता. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात साहाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यानंतरच्या सामन्यांमध्ये त्याला खेळता आले नाही. अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात साहा हा एकमेव यष्टीरक्षक असल्यामुळे त्याला या सामन्यात खेळता आले नाही, तर त्याच्या जागी दिनेश कार्तिक किंवा लोकेश राहुलला संघात स्थान देण्यात येऊ शकते. पार्थिव पटेल हाही पर्याय असल्याचे समजते.

साहाच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने सांगितले की, कोलकाताविरुद्धच्या सामन्यात साहाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे साहाला चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळता आले नव्हते. सध्या साहावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. येत्या काही दिवसांमध्ये त्याची दुखापत किती गंभीर आहे हे पाहिले जाईल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याच्या वेळी देखील साहा जायबंदी झाला होता. तेव्हा त्याच्या जागी पार्थिव पटेलला संधी देण्यात आली होती. सध्या भारतीय संघापुढे दिनेश कार्तिक, ऋषभ पंत आणि लोकेश राहुल यांच्या रूपाने पर्याय उपलब्ध असून संघात कोणाची वर्णी लागते हे पहाणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)