वृत्तपत्र विक्रेत्याने उभारला जलदुर्ग

पिंपरी – चिंचवडगाव येथील पवना नदीमध्ये जलदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. महाराष्ट्राची संपत्ती असलेल्या किल्ल्याविषयी मुलांना माहिती व्हावी या उद्देशाने येथे खांदेरी किल्ला उभारण्यात आला आहे. भक्ती-शक्ती प्रतिष्ठान आणि गडकिल्ले सेवा समिती यांच्या वतीने वृत्तपत्र विक्रेते रघुराज एरंडे आणि ऋषीकेश परदेशी यांनी किल्ला उभारला आहे.

खांदेरी किल्ला अलिबाग येथे 1679 साली उभारण्यात आला. अलिबागपासून 10 किमी अंतरावर समुद्रात हा किल्ला आहे. या किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती पवना नदीतील बेटावर साकारण्यात आली आहे. किल्ल्यावर 18 बुरूज आहेत. दीपगृह आणि रडार यंत्रणा उभारण्यात आली आहे. काकडे पार्क येथील विसर्जन घाटावरून बोटीने प्रवास करून हा किल्ला पाहता येतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

किल्ल्याबाबत लहान मुलांना माहिती व्हावी यासाठी ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे. खांदेरी किल्ल्यावर सौरऊर्जेमार्फत दिव्यांची सोय करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच पवना नदीतील किल्ल्यावरही सौरऊर्जेचे दिवे बसविले आहेत. जलदुर्ग उभारण्यासाठी आम्हाला 20 दिवसांचा कालावधी लागला. दिवसभर काम सांभाळून रात्री बारापर्यंत आम्ही काम करायचो. लहान मुलांना जलदुर्गांची माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही किल्ला उभारला आहे. येणाऱ्या नागरिकांमध्ये नदी प्रदूषणाविषयी जनजागृती केली जात असल्याचे रघुराज एरंडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)