वृत्तपत्र विक्रेत्यांच्या आंदोलनास मराठी पत्रकार परिषदेचा पाठिंबा

सातारा – वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्यांची सरकार दखल घेत नसल्याने दि. 25 रोजी सर्व विक्रेते धरणे आंदोलन करणार आहेत. त्यास मराठी पत्रकार परिषदेने पाठिंबा जाहीर केला असून धरणे आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पत्रकारांचे पेन्शन, कायदा, मजिठियाची अंमलबजावणी, छोट्या वृत्तपत्रांचे प्रश्‍नांचे घोंगडे भिजत पडले असताना वृत्तपत्र विक्रत्याच्या प्रश्‍नांकडेही सरकार दुर्लक्ष करत आहे. प्रिन्ट मिडियाचा कारभार सर्वस्वी वृत्तपत्र विक्रेत्यांवर अवलंबून आहे. तुटपुंज्या कमिशनवर वृत्तपत्र विक्रेते ताजी वृत्तपत्रे वाचकांपर्यंत पोहोचविण्याचं काम करीत असतात. त्यांच्या मागण्यांसदर्भात अनेक थोरा-मोठ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, केवळ आश्‍वासने मिळाली. त्यामुळे विक्रेते आता रस्त्यावर उतरायला तयार झाले आहेत. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मराठी पत्रकार परिषदेनही आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कामगार कल्याण मंडळाची स्थापन करावी, वृत्तपत्र विक्रेते तसेच हॉकर्स यांना प्रत्येक बस स्टॅन्डवर पेपर विक्रीसाठी स्टॉल लावण्यासाठी जागा मिळावी, विक्रेत्यांना विमा कवच मिळावे, वृत्तपत्र विक्रेत्यांना पेन्शन योजना सुरू करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)