वृत्तपत्र विक्रेते देशमाने यांच्या घरी प्रतिष्ठापना

रांजणगाव गणपती -रांजणगाव येथे भाद्रपद शुद्ध अष्टमीला महालक्ष्मीचे मोठ्या थाटामाटात आगमण झाले. रांजणगाव येथील वृत्तपत्र विकेते सुनिल देशमाने यांच्या पत्नी व तेली समाजाच्या महिला विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षा जयश्री देशमाने यांच्या घरी गौरी प्रतिष्ठापना उत्साहात करण्यात आली. देशमाने यांनी हिमालयातील भगवान शंकराच्या प्रतिकृतीचा देखावा सादर केला. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला होता. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्ञिया महालक्ष्मी गौरीची प्रतिष्ठापना करतात. अशी या मागील आख्यायिका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)