वृक्ष लागवडीबाबतची भूमिका कौतुकास्पद

खंडाळा ः वृक्ष लागवडप्रसंगी सौ. संगीता राजापूरकर-चौगुले, विवेक जाधव, हणमंत गायकवाड आदी मान्यवर. यावेळी खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, संचालक धनाजी डेरे, बापुराव धायगुडे, बंडु राऊत, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, कारखान्याचे सभासद, अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

सौ. संगिता राजापुरकर-चौगुले; खंडाळा कारखान्यावर वृक्षारोपण
खंडाळा, दि. 29 (प्रतिनिधी) – वृक्ष लागवड चळवळीमुळे निसर्ग संपदा वाढुन वातावरणातील तापमानावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. किसन वीर-खंडाळा साखर कारखान्यावरील वृक्ष लागवडीचा उपक्रम पाहुन आनंद झाला. किसन वीर उद्योग समुहाचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली अखंडपणे सुरू असलेली वृक्ष लागवडीबाबतची भूमिका कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन वाईच्या प्रांताधिकारी सौ. संगिता राजापुरकर-चौगुले यांनी केले.
किसन वीर खंडाळा साखर उद्योगाच्या कार्यस्थळावर प्रांताधिकारी सौ. संगिता राजापुरकर-चौगुले यांच्या हस्ते आणि खंडाळ्याचे तहसिलदार विवेक जाधव, खंडाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शंकासुर, सितारंजन अशा विविध जातींच्या 190 झाडांची लागवड करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
सौ. राजापुरकर म्हणाल्या, खंडाळा कारखान्यावर झालेल्या वृक्ष लागवडीमुळे राज्यशासन राबवित असलेल्या वृक्ष लागवड चळवळीला हातभार लागला असून यापुढील काळात किसन वीर उद्योग समुहाने जास्तीत जास्त वृक्ष लागवडीसाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)