वृक्ष लागवडीतील जिवंत रोपांचा दरमहा आढावा

पुणे – वृक्षलागवडी मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात लावण्यात आलेल्या जिवंत रोपांच्या टक्केवारीचे प्रमाण 80 टक्‍क्‍यांपेक्षा कमी राहणार नाही, याबाबत उपाययोजना करण्याची जबाबदारी आता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीवर देण्यात आली आहे. तसेच आणि दरमहा दोन रोपवनांची तपासणी करण्याच्या सूचना शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

राष्ट्रीय वन निती 1988 नुसार देशातील वनांखालील क्षेत्रांचे प्रमाण एकूण भूभागाच्या कमीत कमी 33 टक्के असणे आवश्‍यक आहे. सध्यस्थितीनुसार राज्यातील वन आणि वनाखालील क्षेत्र हे 20 टक्के आहे. या क्षेत्राची भरीव वाढ करणे क्रमप्राप्त आहे. याकरिता सन 2017 पासून राज्यात 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचे निश्‍चित करून त्यानुषंगाने वृक्ष लागवड करण्यात आली आहे. वृक्षारोपण कार्यक्रमातील वृक्ष लागवडीपासून संगोपनापर्यंत नियोजन, अंमलबजावणी आणि संनियंत्रण करिता जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्या पुढील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये स्थायी समित्या म्हणून कार्यरत राहतील, अशी तरतूद करण्यात आली आहे. या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांतर्गत वनेतर क्षेत्रात जी रोपे लावलेली आहेत. त्या जिवंत रोपांची टक्केवारीचा वेळोवेळी आढावा घेण्याच्या सूचना राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांची समिती स्थापन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. महिन्यातून किमान दोन रोपवनांची तपासणी करणे व वस्तुनिष्ठ अहवाल छायाचित्रांसह विभागीय आयुक्त यांना सादर करणे. जिल्ह्यातील सर्व रोपवनातील दरमहा जिवंत रोपांच्या टक्केवारीचा आढावा घेणे तसेच जिवंत रोपे 80 टक्के पेक्षा कमी राहणार नाही, याबाबत उपाययोजना करण्याच्या जबाबदारी या समितीवर देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)