वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट अर्धवटच!

पिंपरी – पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने यावर्षी राज्यात 13 कोटी वृक्ष लागवड करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यापैकी 30 हजार वृक्ष लागवडीचा विडा पिंपरी-चिंचवड महापालिकेने उचलला होता. मात्र, त्यासाठी ठरवलेल्या मुदतीत 40 हजार 154 झाडे लावण्यात उद्यान विभागाला यश आले आहे.

राज्य शासनाने वृक्ष लागवडीचा संकल्प सोडल्यानंतर यावर्षी 60 हजार झाडे 31 जुलै पर्यंत लावण्याची घोषणा महापालिकेच्या उद्यान विभागाने केली होती. मात्र मंगळवार दि. 31 जुलै पर्यंत शहरात फक्त 40 हजार 154 झाडे लावण्यात आले आहेत. यामध्ये छोटी झाडे, 6 ते 7 फुट उंचीची झाडे यांचा समावेश असून देशी आणि दिर्घकालीन टिकणाऱ्या झाडांच्या लागवडीवर भर दिल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तथापि, राज्य सरकारने 1 ते 31 जुलै या दरम्यान राज्यात 13 कोटी वृक्ष लागवड करण्याचे ध्येय ठेवले होते. मात्र सर्वस्तरातील लोकसहभागामुळे महाराष्ट्र सरकारने 31 जुलैपर्यंत 15 कोटी 53 लाख 61 हजार 160 वृक्ष लागवड करण्यात आली असून वर्षभरात आणखी 53 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

शहरात झालेली वृक्ष लागवड
क्षेत्रीय कार्यालयांमार्फत झालेली वृक्षलागवड – अ प्रभाग – 760, ब प्रभाग – 292, क प्रभाग – 612, ड प्रभाग – 1131, इ प्रभाग – 648, फ प्रभाग – 283, ह प्रभाग- 886, ग प्रभाग-120. उद्यान विभागमार्फत क्षेत्रीय कार्यालयनिहाय झालेले वृक्षारोपण – अ प्रभाग – 174, ब प्रभाग – 500, क प्रभाग – 197, ड प्रभाग – 147, इ प्रभाग – 90, ह प्रभाग – 132. याखेरीज दुर्गादेवी टेकडी – 75, रेल्वेलाईनच्या कडेने मेट्रोमार्फत – 50, नदीच्या कडेने – 1200, मिल्ट्री हद्दीमध्ये – 24473, रोपवाटीकेतून वाटप व विक्री – 5580, गृहरचना संस्था – 277.

महापालिकेकडून शहरामध्ये आत्तापर्यंत 40 हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यामध्ये विविध जातीच्या तसेच उपयुक्त वृक्षरोपांचा समावेश आहे. येत्या 15 दिवसात 60 हजार वृक्ष लागवडीचे ध्येय आहे. हे ध्येय उद्यान विभाग सहज पुर्ण करेल. यामध्ये 10 हजार वृक्ष हे उद्यान विभागामार्फत लावण्यात येणार आहेत.
– सुरेश साळुंखे, मुख्य उद्यान अधिक्षक, महापालिका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)