वृक्ष लागवडीचा “लक्ष्यभेद’ हुकला!

पिंपरी – दिवसेंदिवस वाढते तापमान आणि हवामानातील बदल याकरिता राज्य शासनाने यावर्षी तब्बल 13 कोटी वृक्ष लागवड करण्याचे ध्येय ठेवले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेने या कार्यक्रमात सहभागी होवून 60 हजार वृक्ष लागवड शहराच्या विविध भागांत करण्याचे निश्‍चित केले होते. दि. 31 जूलैपर्यंत ही वृक्षलागवड करण्याचे “टार्गेट’ होते. मात्र, महापालिका उद्यान विभागाचे काम कासवगतीने सुरू असून, त्यामुळे वृक्ष लागवडीचा “लक्ष्यभेद’ हुकला आहे.

दि. 1 सप्टेंबर पर्यंत उद्यान विभागाने 47 हजार 778 वृक्ष लागवड केली आहे, असा कागदोपत्री दावा केला आहे. राज्य शासनाचे 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दि. 31 जूलैला पूर्ण झाले. त्याहून 15 कोटीपेक्षा जास्त वृक्ष राज्य शासनाने लावले आहेत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. वर्षभरात 53 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाला निर्धारित “टार्गेट’ पूर्ण करता आलेले नाही. येत्या 10 ते 15 दिवसांत 60 हजार वृक्ष लागवडीचे ध्येय पूर्ण करण्यात येईल, असा विश्‍वास संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यानुसार, दररोज सरासरी एक हजार वृक्ष लागवड आगामी पंधरा दिवसांत होणार का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

“मेट्रो’ चे खात्यात शून्य नोंद…
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 60 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार होती त्यात “मेट्रो’कडून “हाफकीन’ कंपनीच्या परिसरात 4 हजार वृक्ष लावण्यात येणार होते. मात्र, अद्याप “हाफकीन’ कडून परवानगी पत्र न मिळाल्याने ती वृक्ष लागवड रखडली आहे.

प्रभाग कार्यालयांची आकडेवारी (वृक्ष लागवड)
अ- प्रभाग- 759, ब- प्रभाग-441, क-प्रभाग-698, ड-प्रभाग- 1248, इ-प्रभाग-977, फ-प्रभाग-556, ह-प्रभाग-446, ग-प्रभाग-155, अ-प्रभाग उद्यान -280, ब- प्रभाग उद्यान-319, क-प्रभाग उद्यान- 197, ड प्रभाग उद्यान- 237, इ- प्रभाग उद्यान -90, फ प्रभाग उद्यान – 00, ह प्रभाग उद्यान – 299, ग प्रभाग उद्यान – 62, दुर्गादेवी टेकडी – 50, मेट्रोमार्फत 200, नदीच्या कडेने -1200, मिल्ट्री हद्दीमध्ये-30,000, रोपवाटीकेतून विक्री व वाटप-6977, गृहरचना संस्था- 2787, असे एकूण 47,778 इतके वृक्ष आत्तापर्यंत लावण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)