वृक्ष प्राधिकरण समितीवर 13 सदस्यांची नियुक्‍ती

सभागृहात नावे जाहीर ः महापौर नितीन काळजे यांनी दिली मंजुरी

पिंपरी,  (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवरील सदस्यांचा कार्यकाल संपुष्टात आल्याने समितीवर नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेतील राजकीय पक्षांच्या संख्याबळाचा तौलानिक निष्कर्ष काढून 13 नगरसेवकांची मंगळवारी (दि. 20) सर्वसाधारण सभेत नियुक्‍ती करण्यात आली.

भाजपचे नगरसेवक शितल शिंदे, विलास मडिगेरी, तुषार हिंगे, तुषार कामठे, संतोष लोंढे, प्रियंका बारसे, वसंत बोऱ्हाटे, राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर, श्‍याम लांडे, वैशाली घोडेकर, शिवसेनेचे ऍड. सचिन भोसले, अपक्ष नवनाथ जगताप आणि साधना मळेकर यांची नियुक्ती केली असल्याची घोषणा महापौर नितीन काळजे यांनी सर्वसाधारण सभेत केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्याने पूर्वीची वृक्ष प्राधिकरण समिती संपुष्टात आली आहे. त्यामुळे नव्याने समितीची स्थापना करण्यात येणार आहे. पाच वर्षांसाठी स्थापना करण्यात येणाऱ्या या समितीचे महापालिका आयुक्‍त हे पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत. अतिरिक्‍त आयुक्‍त कार्याध्यक्ष, तर मुख्य उद्यान अधीक्षक हे वृक्ष अधिकारी असणार आहेत. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमानुसार वृक्ष प्राधिकरणाची स्थापना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)