वृक्षारोपण ही काळाची गरज : वीरकर

मासाईवाडी : वृक्षारोपण प्रसंगी सखाराम वीरकर व इतर.

गोंदवले, दि. 6 (वार्ताहर) – वृक्षारोपण ही काळाची गरज असून त्याचे संगोपन प्रत्येकाने करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मासाईवाडीचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सखाराम वीरकर यांनी केले.
जिल्हा परिषद शाळा मासाईवाडी, ता. माण येते नुकतच वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. वीरकर म्हणाले, आपल्याकडे दरवर्षी पर्जन्यमान कमी असून परिसर दुष्काळसदृश्‍य असतो. यावर आपण प्रत्येक नागरिकाने जास्तीत जास्त झाडे लावून आपल्या भागातील नैसर्गिक परिस्थिती बदलण्यासाठी बहुमूल्य योगदान देणे गरजेचे आहे. तसेच झाडांचे योग्य संवर्धनही करण्याची गरज आहे. यावेळी दानशूर ग्रामस्थांनी शाळेला रोपे भेट दिली सूत्रसंचालन दत्ता तुपे यांनी केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक विजय ढालपे यांनी केले तर मुख्याद्यापक राजाराम गंबरे यांनी उपस्तीत सर्वांचे आभार मानले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)