वृक्षारोपण करुन साजरी केली वटपौर्णिमा

निगडी – वट पौर्णिमेला पर्यावरणासाठी महत्त्वाच्या वट वृक्षाचे पूजन केले जाते. सध्याचा पर्यावरणाचा ऱ्हास पाहता वट वृक्षाच्या पूजनासोबत त्याचे रोपण आणि संवर्धन देखील गरजेचे आहे. हीच बाब ध्यानात घेऊन एन्व्हायर्नमेंट कन्झर्वेशन असोसिएशनने (इसीए) वडाच्या रोपांचे रोपण केले.

बुधवार दि. 27 ला निगडी येथील सिटी प्राईड स्कूल, भोईरनगर येथील जयवंत भोईर प्राथमिक शाळा, चिंचवड येथील महाराष्ट्र कल्याण केंद्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, उद्यान विभाग पिंपरी, निवृत्त शिक्षक संघ, इसीएच्या एकत्रित उपक्रमातून महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राच्या आवारात व बाहेरील बाजूस 39 भारतीय रोपे लावण्यात आली. पहिल्या टप्प्यात 39 व दुसऱ्या टप्प्यात 80 झाडांचे रोपण होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, कडुलिंब, बकुळ, अशोक अशा प्रकारची झाडे शास्त्रीय पद्धतीने लावण्यासाठी महापालिका उद्यान विभागाची मदत व मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. सिटी प्राईड स्कूल, जयवंत भोईर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत इसीए सदस्यांनी वृक्षारोपण केले व पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत प्रबोधन केले. पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण विभागातून निवृत्त शिक्षकांनी या उपक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महिलांनी भारतीय प्रथेनुसार मनोभावे वडाची पूजा केली व आज वडाची 10 फूट उंचीची पूर्ण वाढ झालेली 9 झाडे लावली. पिंपळाची सुद्धा तेवढ्याच उंचीची 7 झाडे स्वतः लावून घेतली. कामगार कल्याण मंडळाच्या गुणवंत कामगारांना “एक कामगार-एक झाड’ संकल्पनेत आवारात रोपांचे संवर्धनाचे कार्य सोपवावे, अशी सूचना विकास पाटील यांनी केली.

महापालिका मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके, प्रकाश गायकवाड, पर्यावरण तज्ज्ञ विकास पाटील, हिरामण भुजबळ, डॉ. अभय कुलकर्णी, वंदना सावंत, वंदना कोरपे, कामगार कल्याणचे प्रदीप बोरसे, सुरेश पवार, बाळासाहेब गायकवाड, इसीए तर्फे कामोद नेरकर, प्रभाकर मेरुकर, मृगेंद्र डमकले, सुभाष चव्हाण, अनघा दिवाकर, विनय मोने, सिकंदर घोडके, गोविंद चितोडकर उपस्थित होते. वृक्षारोपण झाल्यावर त्याची संवर्धनाची जवाबदारी विकास पाटील यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण संचालकांना घेण्याबाबत विनंती केली. प्रत्येकाने आपल्या घर जवळील झाडाचे संगोपन केल्यास आपले शहर स्वच्छ व सुदर बनेल, अशी अपेक्षा व्यक्‍त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)