वृक्षलागवडीतून विषमुक्‍त शेतीकडे प्रवास सुरू

संगमनेर – आरोग्य हीच खरी संपत्ती असून चांगल्या आरोग्यासाठी निसर्गाची उपासना आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून 40 हजार वृक्षांचे रोपण करणारी ही संस्था एक आनंदी संस्था असून, यावर्षी 13 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प सरकारने केला आहे. यातून पुढील पिढ्याच नव्हे तर पुनर्जन्म घेणाऱ्यांना देखील चांगला श्वास घेता येईल. विषयुक्त शेतीकडून विषमुक्त शेतीकडे आता प्रवास सुरू झाल्याचे प्रतिपादन अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
संगमनेरमध्ये शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने बांधण्यात आलेल्या माधवलाल मालपाणी योग व निसर्गोपचार केंद्राचे उद्‌घाटन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले; त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, बीव्हीजी ग्रुपचे संस्थापक हनुमंत गायकवाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, संस्थेचे अध्यक्ष बिहारीलाल डंग, कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, प्राचार्य केशवराव देशमुख, आदी उपस्थित होते.

ना. मुनगंटीवार म्हणाले, “”समाजोपयोगी कामासाठी सामाजिक दायीत्व ठेवत मालपाणी परिवाराने शेवटच्या घटकासाठी समाजोपयोगी कामासाठी विविध क्षेत्रात योगदान दिले. निसर्गोपचार केंद्रासाठी दान देणाऱ्या दानदात्यांचा यावेळी सत्कार यानिमित्ताने झाला. अमेरिकेत 20 लाख लोक संस्कृतवर संशोधन करत आहेत. व्हॉटस्‌ऍप हा 21 व्या शतकातील सर्वाधिक अज्ञान पसरविणारा असून, समाजातील मोठी शक्ती आज व्हॉटस्‌ऍप व फेसबुकच्या माध्यमातून श्रम वाया घालवत आहे.” संस्थेच्या मागण्या जर नियमात आणि चौकटीत बसणाऱ्या असतील तर मी सोबत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
ना. शिंदे म्हणाले, “”शरीराच्या योग्य काळजीसाठी निसर्गोपचाराची, तर चांगल्या आरोग्यासाठी विषयुक्त शेतीची आवश्‍यकता आहे. ऑरगॅनिक शेतीसाठी मुनगंटीवार यांनी भरीव निधीची उपलब्धता अर्थसंकल्पात करून दिली. जगातील मोठी लोकसंख्या आपली असल्याने जग आपल्याकडे मार्केटिंगच्या दृष्टीने बघत आहे. कॅन्सरमुक्त भारत आणि विषमुक्त शेती ही देशाची गरज आहे. निसर्गोपचार केंद्रासाठी मालपाणी परिवाराचे योगदान महत्त्वाचे आहे.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)