वृक्षप्राधिकरण समिती सदस्यांचा सिक्कीम दौरा

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका वृक्ष प्राधिकरण सदस्यांबरोबरच महापालिका अधिकाऱ्यांचा पुढील महिन्यातील नियोजित सिक्कीम दौरा रद्द करण्यात आला आहे. वृक्ष प्राधिकरण समितीच्या मंगळवारी (दि.24) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे या दौऱ्यावर होणाऱ्या नऊ लाख 53 हजार रुपयांच्या खर्चाची बचत होणार असल्याचा दावा या सदस्यांनी केला आहे.

वृक्ष प्राधिकरण सदस्यांबरोबरच महापालिका अधिकारी पुढील महिन्यात सिक्कीम दौऱ्यावर रवाना होणार होते. या दौऱ्यासाठी स्थायी समितीने नऊ लाख 53 हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली होती. महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे देश, परदेशातील दौरे नेहमीच विरोधक आणि नागरिकांच्या टिकेचे धनी होतात. सिक्‍कीम दौऱ्यावर देखील मंजुरी मिळाल्यानंतर टिकेची झोड उठली होती. प्रसारमाध्यमातून देखील या दौऱ्यावर आणि त्याच्या फलिताबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (दि.24) वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित असलेल्या बहुतेक सदस्यांनी या दौऱ्याला विरोध केल्यान हा दौरा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती सदस्य विलास मडीगेरी यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)