वृक्षप्राधिकरण समिती बैठकीत आयुक्तांना “नो इंटरेस्ट’

वृक्ष लागवडीचा आराखडा तयार होणार कधी?
राज्य सरकारच्या धोरणानुसार राज्यात 13 कोटी झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पुणे शहरात 60 हजार झाडे लावण्याचे प्रस्तावित असून, त्याचा आराखडा तयार करणे आवश्‍यक आहे. वृक्ष प्राधिकरणाची बैठकच होत नसल्याने या आराखड्याबाबत निर्णय होत नाही. तसेच या समितीला 25 कोटी रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद आहे. ही तरतूद किती खर्ची पडली. त्यातील किती निधी शिल्लक आहे, कोणती कामे प्रस्तावित आहेत, याची समितीला माहिती मिळणे आवश्‍यक आहे. मात्र, प्रशासनाकडून बैठकच घेण्यात येत नसल्याने समितीचे कामकाज चालत नसल्याची टीका वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य आदित्य माळवे आणि संदीप काळे यांनी केली आहे.

60 दिवस उलटूनही बैठक होत नसल्याने प्रश्‍न

पुणे – वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीत आयुक्तांना “इंटरेस्टच’ नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे 60 दिवस उलटूनही वृक्षप्राधिकरणाची बैठक न झाल्याने सदस्य संतापले आहेत. या बैठकांमध्ये वृक्ष तोडीच्या परवानगीबाबत सदस्यांकडून अनेक प्रश्‍न उपस्थित होत असल्याने प्रशासन जाणीवपूर्वक ही बैठक घेत नसल्याचा आरोप सदस्यांकडून करण्यात येत आहे.

महापालिका आयुक्तांना 25 झाडे तोडण्यापर्यंतची परवानगी देण्याचे अधिकार प्राप्त असल्याने या बैठका घेण्याची प्रशासनाला आवश्‍यकता भासत नसल्याची खरमरीत टीका वृक्ष प्राधिकरण समितीतील सदस्यांनी केली आहे. महापालिका प्रशासनाने सोमवारी वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, या बैठकीचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त कुणाल कुमार हे रजेवर असल्याने ही बैठक होवू शकली नाही. समितीची बैठक 45 दिवसांत घेणे बंधनकारक आहे. राज्य सरकारने काढलेल्या नवीन आदेशानुसार तर ही बैठक 21 दिवसांत होणे अपेक्षित आहे. मात्र, 60 दिवस उलटूनही महापालिका प्रशासनाकडून बैठक आयोजित केली नाही.

राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार 25 झाडे तोडण्यापर्यंतचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांना ही बैठक घेण्याची गरज वाटत नाही. मात्र, ही बैठक होत नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. या बैठकांमध्ये सदस्यांकडून झाडे तोडण्याला परवानगी देण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. प्रशासनाकडून परवानगी दिल्याबाबत आक्षेप नोंदवण्यात येत असल्याने ही बैठक होणार नाही, याकडे प्रशासनाचा कल दिसतो आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीतही प्रशासनाने दिलेल्या परवानग्यांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, अशी माहिती सदस्यांकडून देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)