वृक्षपूजन मोहीमेअंतर्गत शिर्डीत वृक्षारोपण

शिर्डी – शिर्डी येथील स्वस्तिश्री आध्यत्मिक परिवाराच्या वतीने वट पौर्णिमेनिमित्त आधी वृक्षारोपण मग वृक्ष पूजन या मोहीमेअंतर्गत शिर्डीत वृक्षारोपण करण्यात आले.
वटपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून शिर्डी येथील स्वस्तिश्री अध्यात्मिक केंद्रावर गुरुवर्य वैभवशास्त्री रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिर्डी सोसायटीचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक आप्पासाहेब कोते ह्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राहाता तालुक्‍यत 50 वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ मैथिली पितांबरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी वैभव गुरुजींनी सांगितले की, आपल्या पूर्वजांनी वटपूजनच्या मनुष्याला निसर्गाशी जोडले आहे. पावसाळा सुरू झाला आह. अश्‍या वेळी आपण वृक्ष लावून त्याचं संवर्धन करावे. आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करिन वडाचे झाड 100% ऑक्‍सिजन देणारे आहे. त्याचे औषधी गुणधर्म जाणून पूजेबरोबर त्याचे संवर्धन ही करावे. यावेळी गुरुजींनी लोकांना स्वस्तिश्री परिवाराच्या ह्या वृक्षारोपण अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वस्तिश्री प्रमुख वैशाली ताई गोंदकर व सर्व भगिनींनी प्रयत्न केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)