वृक्षतोड रोखण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण द्या

कायद्याचे अपुरे ज्ञान : वृक्षप्रेमी संघटनांची मागणी

पुणे – शहरात सातत्याने होणारी बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्यासाठी आणि तसे झाल्यास त्याची पोलीस तक्रार नोंदवून कायदेशीर कारवाईसाठी वृक्षप्रेमींची विशेष तुकडी नेमावी. वृक्षतोड हा गुन्हा असूनही त्याचे फारसे ज्ञान पोलिसांनाच नसते. यासाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण घेतले जावे, अशी मागणी शहरातील वृक्षप्रेमी संघटना करत आहेत.

-Ads-

वृक्ष छाटणीच्या नावाखाली शहरात विविध ठिकाणी झाडांची कत्तल केली जाते. अशा कामांसाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची परवानगी आवश्‍यक असतानाही, ती न घेता सर्रासपणे वृक्षतोड होते. तर, काही वेळा खोटी पत्रे देऊन वृक्ष तोडली जातात. हा बेकायदेशीर प्रकार सुरू असताना पोलीस मात्र कायद्याच्या माहितीअभावी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला जातो.

याबाबत वृक्षप्रेमी कार्यकर्ते विनोद जैन म्हणाले, “धोकादायक वृक्षांच्या सबबीखाली चांगल्याप्रकारे वाढ झालेली उपयुक्त अशी झाडे तोडली जातात. हा प्रकार रोखण्यासाठी वृक्षप्रेमी कार्यकर्ते निश्‍चितच काम करू शकतात. मात्र, त्यांना कोणतेच अधिकार नसल्याने त्यांचे बोलणे ऐकले जात नाही. तर दुसरीकडे पोलिसांना वृक्षतोडीच्या कायद्यासंदर्भात फारसे ज्ञान नसल्याने, त्यांच्याकडूनही याची दखल घेतली जात नाही. त्यामुळेच बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी वृक्षप्रेमींची एक विशेष टीम नेमली जावी. या टीममध्ये कायदेशीर आणि शास्त्रीय ज्ञान असलेले आणि वृक्षाविषयी जिव्हाळा असणारे सदस्य असावेत.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)