वृक्षतोड बंदी, कापूस सरसकट पंचनाम्यांचा ठराव मंजूर

भावीनिमगाव – शेवगाव तालुक्‍यातील बालमटाकळी ग्रामसभेत वृक्षतोडीवर बंदी व कपाशीचे बोंडअळीने झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे ठराव मंजूर करण्यात आले.
ग्रामसेवकांच्या संघटनेने 26 जानेवारीला ग्रामसभा न घेण्याचे ठरवले होते. त्यानंतर 30 जानेवारीला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपसरपंच तुषार वैद्य होते. ग्रामसेवक राजाराम काटे यांनी जमाखर्च व विविध विषयांचे वाचन केले.

गावातील लोकसंख्येचा विचार करता पूर्वीची पाणी साठवण व्यवस्था अपुरी पडत आहे. पाणी योजनेत गावाचा समावेश असला तरी योजना रडतखडत चालत असल्याने गावात 15 दिवसांतून एकदा पाणी येते. यावर तोडगा म्हणून गाव शिवारात सार्वजनिक विहीर खोदण्याचा विषय ग्रामसभेत चर्चिला गेला. कामगार तलाठ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे कपाशीचे पंचनामे रखडले आहेत, असेही काही ग्रामस्थ सभेत ठामपण ेम्हणाले. शेतकरी पुढील पीक घेण्यासाठी कपाशी उपटत आहे. शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी कामगार तलाठी यांच्याकडून अडवले जात आहे, असाही मुद्दा ग्रामसभेपुढे आला. यावर शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाचे सरसकट पंचनामे करावे, असा ठराव ग्रामसभेत संमत करण्यात आला. पिण्याच्या पाण्याची नियमित व्यवस्था करण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे. ग्रामस्थांनी मात्र पाणी व घरपट्टी जमा करून सहकार्य करावे, असे आवाहन उपसरपंच तुषार वैद्य व ग्रामसेवक राजाराम काटे यांनी केले. बालमटाकळी शिवारात सध्या अवैधरीत्या मोठी वृक्षतोड दलालांमार्फत होत असून वेळोवेळी तक्रार करूनही ती बंद होत नसल्याचा सूरही ग्रामसभेत उमटला.

-Ads-

चंद्रकांत बागडे, बबन वाघुंबरे, अमृत बाफना, बादशाह मुकादम, माणिक कवडे, अशोक काळे, मल्हारी घुले, गौतम छाजेड, सर्जेराव घोरपडे, रतन देशमुख, उमेश घाडगे, सोमनाथ धोंगडे, सरताज शेख, धनंजय देशमुख, बापूराव पवार, यशवंत गव्हाणे, किरण पाथरकर, मैनुद्दीन शेख, लियाकत शेख, हबीब शेख, इसाक शेख, जयप्रकाश बागडे यावेळी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)