वृक्षतोड प्रकरणाला हप्तेखोरीचा वास

नगराध्यक्षांकडे माफी मागून प्रकरण संपणारे नाही

सातारा – सातारा पालिकेच्या मंगळवारी झालेल्या वृक्ष कमिटीची बैठकीनंतर सातारा पालिकेच्या वर्तुळात व्यवस्थेत पाझरत असलेल्या हप्तेखोरीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यामध्ये बांधकाम विभाग हा अजेंड्यावर असून नगरपालिका अभियंता भाऊसाहेब पाटील यांनी पदाधिकाऱ्यांचा व नगराध्यक्षांचा मान राखायलाच हवा, बेजबाबदारपणे उत्तरे देणे आणि मुळ प्रश्‍न बाजूला टाकणे या कामाच्या पध्दतीमुळे भाऊसाहेब पाटील यांची कार्यपध्दती सातत्याने वादग्रस्त ठरत आहे. आरटीओ कार्यालयातील ब्रेकिंग टेस्ट ट्रकवर आधी झाडे तोडली गेल्यानंतर मग कशी काय परवानगी दिली गेली, आणि तीन झाडांना परवानगी मग उरलेल्या चार झाडांच्या परवानगीचे काय? अशा प्रश्‍नांना भाऊसाहेबांनी कितीही टाळले तरी बांधकाम विभागाचा गलथानपणा उघडा झाल्याशिवाय राहत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगरपालिकेतल्या काही अधिकाऱ्यांनी थेट आर्थिक तडजोडीची मखलाशी केल्याची खमंग चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. आणि त्याच्या संशयाची सुई सुध्दा बांधकाम विभागावरच रोखली गेल्याने जाऊ तिथं खाऊ या समीकरणात सातारा नगर पालिका तंतोतंत फिट बसते हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. बैठकीत सविआचे नगरसेवक वसंत लेवे यांनी आरटीओ कार्यालय आवारातील झाडा प्रश्‍नांवर नगर अभियंता भाऊसाहेब पाटील यांना धारेवर धरले होते. जोरदार शाब्दिक वादावादी झाली. पाटील यांनी प्रश्‍नांची उर्मटपणे उत्तरे दिल्याने लेवे भलतेच संतापले होते. पदाधिकाऱ्यांना उर्मटपणे उत्तरे देणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना काळे फासले पाहिजे. यावेळी वातावरण तणावग्रस्त बनले होते.

सातारा पालिकेच्या वृक्ष कमिटी बैठक शनिवार दि. 5 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतु या बैठकीत कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याने नगराध्यक्षा माधवी कदम यांनी फाईल भिरकावून ही बैठक तहकूब केली होती. तहकूब केलेली वृक्ष कमिटी बैठक पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात मंगळवार दि. 8 रोजी झाली. यावेळी आरटीओ कार्यालयाच्या आवारातील झाडे तोडली. त्याचा चौकशी अहवाल भाऊसाहेब पाटील सादर करावा अशी मागणी नगरसेवक वसंत लेवे यांनी अधिकारी भाऊसाहेब पाटील यांच्याकडे मागणी केली.

भाऊसाहेब पाटील म्हणाले, मी चौकशी अहवाल तयार केला नाही. चौकशीसाठी मी गेलोच नव्हतो असे दुरूत्तर केले. यावर वृक्ष कमिटी सदस्य सनी शिंदे यांनाही पाटील तुम्ही आरटीओ कार्यालयात पंचनाम्यासाठी गेला होता. तुम्हीच चौकशी अहवाल तयार केला आहे. हा पुरावा आहे, असे सांगितले नगरसेवक वसंत लेवे यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळी गदारोळ निर्माण झाला होता. मात्र काहींनी मध्यस्थी केल्यावर तणाव निवळला तरी भाऊसाहेबांच्या अनेक कारनाम्यांची चर्चा सातत्याने होतच असते. त्यांना स्वत:च्या तीन टक्‍क्‍याशिवाय दुसरे दिसत नाही, असे ठेकेदार वर्तुळात गमतीने म्हटले जाते. गमतीचा भाग सोडला तरी बऱ्याच प्रकरणांमध्ये तथ्य सापडावे अशा घटना नगरपालिकेमध्ये घडल्या आहेत.

एका ठेकेदारानेच नगराध्यक्षांच्या समोरच भाऊसाहेबांच्या तीन टक्‍क्‍यांची कुंडली मांडल्याचे प्रकरण फार जुने नाही. मात्र त्याचा साहेबांना काहीही फरक पडत नाही. बेकायदा वृक्षतोड प्रकरणात आर्थिक तडजोड कोणी केली आणि कशी केली या सर्व प्रकरणाचा रहस्यभेद होणारच आहे. आपल्या पोळीवर तुप पडते का ? याची खातरजमा करण्यातच काही जणांचा वेळ खर्ची पडतो. त्यामुळे भाऊसाहेबांनी कामाकडे किती लक्ष दिले, आणि छपाईत किती लक्ष दिले हे सारासार दिसतेच आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)