वृक्षतोडीबद्दलच्या सुनावणीवेळी नागरिकांना दमदाटी, हकलण्याचा प्रयत्न

प्राधिकरण अध्यक्ष सौरभ राव यांचीही दांडी : प्रशासनही उदासीनच

पुणे – शहरातील वृक्षतोडीच्या सुनावणीबाबत महापालिका प्रशासनाची उदासीनता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. वृक्ष प्राधिकरण अध्यक्षांच्या उपस्थित होणाऱ्या वृक्षतोडीच्या पूर्वनियोजित सुनावणीसाठी ऐनवेळेला अध्यक्षांनी अनुपस्थिती दर्शविली. तसेच या सुनावणीसाठी जमलेल्या वृक्षप्रेमींना दमदाटी करून त्या ठिकाणाहून हाकलून लावण्याच्या प्रयत्न पालिका अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळेच शहरातील वृक्षतोडीबाबत महापालिकेचा बेजबाबदार असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

वृक्षतोडीबाबत असणाऱ्या हरकती व सूचनांच्या सुनावणीसाठी वृक्ष प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखाली वृक्षप्रेमींची बैठक सोमवारी महापालिका इमारतीत बोलावण्यात आली होती. प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत ही सुनावणी होणे अपेक्षित होते. मात्र, ऐनवेळेला राव हे या बैठकीस अनुपस्थित राहिले. त्यानंतर सुमारे तासभर या बैठकीबाबत गोंधळ सुरू होता. वृक्षप्रेमींनी बराच आग्रह केल्यानंतर अतिरिक्‍त आयुक्‍त राजेंद्र निंबाळकर यांना आता प्राधिकरणचे अध्यक्षपद सोपविण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. निंबाळकर बैठकीस आले, परंतु येताच त्यांनी सर्व उपस्थितांना बाहेर जाण्यास सांगितले. तसेच या बैठकीची वैयक्तिक स्वरूपात सुनावणी घेतली जाईल, अशा सूचना देखील दिल्या. याला विरोध करत वृक्षप्रेमींनी एकत्रित सुनावणी घेण्याचा हट्ट धरल्याने निंबाळकर यांनी सुनावणी बैठक रद्द करत त्या ठिकाणाहून निघून गेले.

वृक्ष सुनावणीबाबत नेहमीच अशाप्रकारे टाळाटाळ केली जात असते. एक तर शहरात होणारी वृक्षांची कत्तल आणि त्यात नियमांच्या अंमलबजावणीबाबत केली जाणारी हयगय यामुळे शहरातील वृक्ष संपत्तील मोठा धोका उद्‌भवत आहे. असे असूनही माहापालिका प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी अशाप्रकारे पळ काढत आहे, याचा तीव्र निषेध कर असल्याचे वृक्षप्रेमी कार्यकर्ते विनोद जैन यांनी सांगितले. यावेळी समीर निकम, चैतन्य केत, डॉ. अभिषेक हरिदास, दीपक निकाळजे, उमेश नाईक उपस्थित होते.

बैठकीच्या सुरवातीपासूनच सुनावनीसाठी आलेले लोक रूक्षपणे बोलत होते. तुम्हाला कायदा माहिती आहे का? त्याची अंमलबजावणी करता येते का? अशा आविर्भावात त्यांनी प्रश्‍न विचारण्यास सुरूवात केली. सुनावणी वैयक्तिक स्वरूपात घेतली जाईल, त्यामुळे उर्वरीत लोकांना बाहेर जाण्यास सांगितल्यावर त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळेच ही सुनावणी रद्द करण्यात आली. याबाबत पुनर्विचार करून पुन्हा एकदा बैठक घेतली जाणार आहे.

– राजेंद्र निंबाळकर, अतिरिक्‍त आयुक्‍त, मनपा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)