पालघर – सोनी टीव्हीवरील पोरस, महाकाली, शनिदेव या मालिकांच्या सेटला आज भीषण लागली. या आगीत वृदांवन स्टुडिओ जळून खाक झाला आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळच्या उंबरगावमधल्या देहरी इथे ही आग लागली.
या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी स्टुडिओचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या.

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतु स्टुडिओमध्ये पीओपी आणि प्लास्टिकचे मोठे काम असल्याने शॉर्ट सर्किटने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. वृंदावन स्टुडिओत पोरस, महाकाली, शनिदेव आणि छोट्या-मोठ्या धार्मिक मालिकांचे चित्रीकरण सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)