वुई वॉंट जस्टिज फॉर तौसीफ

नगर संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

नगर – जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणाऱ्या तौसीफ शेख याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासाठी अहमदनगर संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कर्जत येथील दावल मलिक ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी तौसीफ शेख या युवकाने अनेकवेळा निवेदन देऊन उपोषण केले होते. वक्‍फ बोर्डाचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी याबाबत कानडोळा केला. हा प्रश्‍न सुटत नसल्याने तौसीफ याने आत्मदहनाचा इशारा दिला होता. प्रशासनाला जाग येत नसल्याने तौसीफ याने आत्मदहन करून आपली जीवनयात्रा संपवली. त्याच्या मृत्यूस वक्‍फ बोर्डाचे व जिल्हा प्रशासनाचे संबंधीत अधिकारी जबाबदार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

तौसीफ शेख याला न्याय मिळण्यासाठी दावल मलिक ट्रस्टच्या जागेवरील पक्के अतिक्रमणे हटविण्यात यावी, सदर युवकाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, तौसीफ शेख यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी व 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी. तसेच राज्यातील वक्‍फ बोर्डवरील अतिक्रमणाचा आढावा घेऊन सदर अतिक्रमण हटवावे, वक्‍फ जमीनीवरील उत्पन्नाचा पैसा अल्पसंख्यांक समाजाच्या शिक्षण व युवकांच्या रोजगारासाठी खर्च करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मन्सूर शेख, उबेद शेख, अंजर खान, अजीम शेख, आजीम राजे, हनीफ जरीवाला, अत्तार शेख, अफसर शेख, साहेबान जहागीरदार, सरफराज जहागीरदार, नईम सरदार, अमीर सय्यद, अल्तमश जरीवाला, रियाज सय्यद, रेखा जरे, आबिद हुसेन, शानू सय्यद, अफजल सय्यद, रफिक मुन्शी, अनिस शेख, हनीफ शेख, अल्ताफ शेख, डॉ. परवेज अशर्फी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, तालुकाध्यक्ष गणेश दरेकर, रेखा जरे पाटील यांच्यासह विविध स्वयंसेवी संघटनेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)