वीर शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात

गराडे – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वीर (ता. पुरंदर) येथे नवीन शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी दाखलपात्र विद्यार्थ्यांचे औक्षण, गुलाबपुष्प, शालेय साहित्य व खाऊ मान्यवरांच्या हस्ते देऊन शाळेत प्रवेश देण्यात आला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय पाटसकर, मुख्याध्यापिका रेणुका म्हस्के, विदया भोसले, सपना घम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा योगिता काकडे, माता पालक संघ सदस्या योगिता चव्हाण, धनश्री समगीर, सानिया इनामदार, मनिषा सुतार, दिपाली कदम, तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता पालक शिक्षक पालक संघ सदस्य, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पाटसकर यांनी उपस्थित पालकांना शिक्षणाचे महत्त्व व पालक जबाबदारी यावेळी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका म्हस्के यांनी पालकांना ई-लर्निंग प्रोजेक्‍टर संच व त्यातील अभ्यासक्रम याविषयी माहिती सांगितली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)