वीर येथे हजारो भाविकांची गर्दी

परिंचे- श्री क्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे मार्गशीर्ष अमावस्येनिमित्त हजारो भाविकांनी श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे 4.30 वाजता मूर्तींची महापूजा करून मुख्य घाबारा बंद करण्यात आला व सकाळी सहा वाजता मंदिराचा मुख्य गाभारा भाविकांना दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळी भाविकांच्या व देवस्थान ट्रस्टच्या वतीने अभिषेक करण्यात आले. सकाळी 10 वाजता दहीभात पूजा बांधण्यात आली होती. दुपारी 12 वाजता धूपारती होऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. कडाक्‍याची थंडी असूनही पहाटेपासून देऊळवाड्यात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मंदिरातील दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम झाला. यावेळी सासवड पोलीस स्टेशन तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ यांनी दिली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना बारामतीचे सदाशिव सातव व अविनाश धुमाळ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक कार्यक्रमा वेळी देवस्थानचे उपाध्यक्ष संभाजी धुमाळ, ट्रस्टचे विश्वस्त दत्तात्रय धुमाळ, सचिव तय्यद मुलानी, दिलीप धुमाळ, ज्ञानेश्वर धुमाळ, बबन धसाडे, नामदेव जाधव, अशोक वचकल, सुभाष समगीर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)