वीर येथे मोफत गॅस कनेक्‍शन

परिंचे- श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत पुरंदर इंडियन गॅस वितरक वतीने दारिद्य्ररेषेखालील महिलांना मोफत गॅस कनेक्‍शनचे वाटप करण्यात आले.
इंडियन ऑइलचे विभागीय व्यवस्थापक सुब्रोत रभ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी भोंगळे पेट्रोलियमचे दिवसे सर, बॅंक ऑफ महाराष्ट्र वीर शाखेचे वैभव सिंघ सर, वीर गावच्या सरपंच मंगल चवरे, अर्पिता धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते. शोभा भोंगळे या महिलेला मोफत गॅस कनेक्‍शन देऊन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत दारिद्र रेषेखालील महिलांसोबत मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती, अति मागासवर्गीय, अंत्योदय अन्न सुरक्षा योजना कार्डधारक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे पुरंदर इंडियन गॅस वितरकचे अविनाश वाघोले यांनी सांगितले. यावेळी “गॅस वापरताना घ्यावयाची काळजी’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जंगम व प्रमोद वाघोले यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)