वीर मराठा वॉरिअर्सला विजेतेपद

एसपीएल स्पर्धा:इलेव्हन ब्लास्टर द्वितीय क्रमांकाचा मानकरी

सातारा – ठोसेघर, ता.सातारा येथील स्व. श्री. छ. अभयसिंहराजे भोसले क्रिडा संकुलनामध्ये आयोजीत करण्यात आलेल्या एसपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये वीर मराठा वॉरिअर्सने रू. 61 हजार 111 रूपयांचे पारितोषिक पटकावले तर इलेव्हन ब्लास्टर या संघाने द्वितीय क्रमांकाचे 31 हजार 111 रूपयांचे पारितोषिक आणि ट्रॉफी पटकावली.

-Ads-

दि. 13 ते 16 एप्रिल या तीन दिवसामध्ये एसपीएलमध्ये इलेव्हन ब्लास्टर विरूद्ध राजे फायटर, सातारा सिक्‍सर विरूद्ध वीर मराठा वॉरिअर्स रॉयल्स स्टार विरूद्ध शिवसह्याद्री वॉरिअर्स, मराठा वॉरिअर्स विरूद्ध अनु इलेव्हन, युनायटेड इलेव्हन विरूद्ध सातारा सिक्‍सर, शिवसह्याद्री वॉरिअर्स विरूद्ध समर्थ पठार वॉरिअर्स, इलेव्हन वॉरिअर्स विरूद्ध रॉयल्स स्टार यांच्यात लढती झाल्या. शनिवार दि. 14 एप्रिल रोजी मराठा वॉरिअर्स विरूद्ध वीर मराठा वॉरिअर्स, शिवसह्याद्री वॉरिअर्स विरूद्ध राजे फायटर, अनु इलेव्हन विरूद्ध सातारा सिक्‍सर, रॉयल्स स्टार विरूद्ध समर्थ पठार वॉरिअर्स, युनायटेड इलेव्हन विरूद्ध वीर मराठा वॉरिअर्स, इलेव्हन वॉरिअर्स विरूद्ध शिवसह्याद्री वॉरिअर्स, मराठा वॉरिअर्स विरूद्ध सातारा सिक्‍सर, समर्थ पठार वॉरिअर्स विरूद्ध राजे फायटर्स, अनु इलेव्हन विरूद्ध युनायटेड इलेव्हन, आणि इलेव्हन ब्लास्टर विरूद्ध समर्थ पठार वॉरिअर्स. रविवारी दि. 15 रोजी अखेरच्या दिवशी युनायटेड इलेव्हन विरूद्ध मराठा वॉरिअर्स, रॉयल्स स्टार विरूद्ध राजे फायटर्स, वीर मराठा वॉरिअर्स विरूद्ध अनु इलेव्हन,कॉलीफायर्स विरूद्ध ऐलिमिनेटर आणि फायनलमध्ये वीर मराठा विरूद्ध इलेव्हन ब्लास्टर यांच्यात लक्षवेधी लढत झाली.

फायनलमध्ये अंतीम समान्यामध्ये वीर मराठा वॉरिअर्सने बाजी मारत 61 हजार 111 रूपये आणि ट्रॉफी पटकावली. तर इलेव्हन ब्लास्टरने 31 हजार 111 रूपयांचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक व ट्राफी पटकावली. या सामन्यात इलेव्हन ब्लास्टर संघाचा संतोष जांगळे हा मालिकावीर ठरला. तर राजेश मोहिते याने उत्कृष्ठ फलंदाजाचा किताब पटकावला. विनोद जाधव हा उत्कृष्ठ गोलंदाज ठरला. पारितोषिक वितरण समांरभाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक प्रकाश चव्हाण, ठोसेघरचे उपसरपंच जयराम चव्हाण, बापूशेठ सपकाळ, आबाजी जाधव, ऍड. अरूण जाधव, सातारा पंचायत समितीचे माजी सदस्य शंकरआप्पा चव्हाण, शशिकांत कणसे, राजू चव्हाण, जयराम चव्हाण, विष्णू पवार, भाजपा तालुका अध्यक्ष अभय पवार, शशि वायकर, बापूशेठ सपकाळ, विशाल भोसले, रघुनाथ चव्हाण, शंकर बेडेकर उपस्थित होते. विजेत्या संघांना प्रकाश चव्हाण, जयराम चव्हाण, आबाजी जाधव यांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले.

प्रारंभी संयोजकांच्यावतीने उपस्थित मान्यवरांचे शिल्ड, शाल व श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रकाश बापू चव्हाण आणि ठोसेघरचे उपसरपंच जयराम चव्हाण यांनी प्रथम क्रमांकासाठी विभागून 61 हजार 111 रूपयांचे बक्षिस जाहीर केले होते. बक्षिस वितरणप्रंसंगी बोलताना प्रकाश चव्हाण म्हणाले, दुर्गम भागातील तरूणांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी एसपीएल सारखी भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेसाठी संयोजकांनी आणखी प्रयत्न करावेत या स्पर्धेसाठी राज्यभरातून स्पर्धक सहभागी होतील असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पारितोषिक मिळाल्यानंतर वीर मराठा वॉरिअर्स आणि इलेव्हन ब्लास्टर या दोन्ही विजयी संघानी मैदानामध्ये जल्लोष करत विजयी मिरवणूक काढली.

पुढील स्पॉन्सरशिप माझ्याकडून पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना ऍड. अरूण जाधव म्हणाले, ठोसेघरसारख्या दुर्गम भागामध्ये येथील तरूणांनी खूप छान मैदान तयार केले आहे. आज दिवसभर क्रिकेटचे सामने पाहत असताना या भागात अत्यंत चांगले खेळाडू असल्याचे स्पष्ट झाले. एसपीएलसारखा उपक्रम राबविणे ही सोपी गोष्ट नाही. याची मला जाणीव असल्याने पुढील वर्षीच्या एसपीएलसाठी मी स्पॉन्सरशिप देणार असल्याची घोषणा जाधव यांनी यावेळी केली. उद्योजक बापूशेठ सपकाळ आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, डोंगरी-दुर्गम भागातील युवकांच्या अंगी नेतृत्व गुणाची क्षमता आहे. हे गेल्या तीन दिवसात झालेल्या सामन्यातून स्पष्ट दिसून आले आहे. याचा आपल्याला मनोमन आनंद वाटत असून पुढील स्पर्धेसाठी लागेल ती सर्वतोपरी मदत तर करीनच त्याचबरोबर स्पॉन्सरशिपची जबाबदारीही घेण्यास मी तयार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)