वीर परिंचे परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य

परिंचे- पावसामुळे वीर परिंचे परिसरातील रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे रस्त्यावर होणाऱ्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागरिकांनी लवकरात लवकर नवीन रस्ता करण्याची मागणी केली आहे.
यादववाडी, परिंचे, राऊत वाडी, वीर परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. श्रीक्षेत्र वीर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असून खड्डे चुकवताना त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याची तसदी घेतली नाही. यादववाडी येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
याबाबत पुरंदर शाखा अभियंता दिनेश गायकवाड यांनी सांगितले की, बाबदेव घाट ते वीर या रस्त्यासाठी चार कोटी रूपये मंजूर झाले आहेत. काही ठिकाणची काम सुरू झालेले नाहीत. पावसाळा संपताच या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. कांबळवाडी ते वीर रस्ता तयार करण्यात येणार आहे. परिसरातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)