‘वीरे दी वेडिंग’ला पाकिस्तानमध्ये बंदी

‘वीरे दी वेडिंग’ हा बहुचर्चित चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच १ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर लॉन्च झाल्यापासून चित्रपटाची आणखी चर्चा होत आहे. असं असलं, तरी पाकिस्तानमधील प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येणार नाही. पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.

चार तरुणींच्या जीवनावर बेतलेल्या या चित्रपटात जवळच्या मैत्रिणींमध्ये सहज होणारे संवाद आहेत. शिव्या आणि सेक्सची चर्चा आहे. यावर आक्षेप घेत पाकिस्तानच्या सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉरनं चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटामध्ये करिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तस्लानिया यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)