वीरमध्ये दुर्गराज रायगडाची हुबेहूब प्रतिकृती

वाल्हे- मोबाईलच्या युगामध्ये लहान मुले दिवाळी कशी साजरी करतात, हेच विसरून गेली आहेत. त्यामुळे युवकांनी मुलांना इतिहासाची जाणीव करून देणं महत्वाचं होतं. म्हणूनच या युवकांनी मुलांना शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती करून देण्यासाठी दुर्गराज रायगडाची हुबेहुब प्रतिकृती तयार केली. किल्ला तयार करण्यापूर्वी सर्वांनी रायगड किल्ल्याला भेट दिली. तेथील सर्व ठिकाणांचा अभ्यास केल्यानंतर किल्ला तयार केला. किल्ला तयार करण्यासाठी अनिल बुणगे, शुभम कुदळे, रोहन समागीर, गणेश चवरे, जयराज चव्हाण, शंभू समागीर, अनिकेत बुणगे, आकाश समागीर, निखिल चवरे, तुषार चवरे, ओंकार चवरे आदींचा समावेश होता.
किल्ल्यावरील चित्त दरवाजा, हत्ती दरवाजा, शिरकाई देवी मंदिर, हत्ती खाना, दारुगोळा कोठार, धान्य कोठार, होळीचा माळ, बाजारपेठ, नगारखाना, राजसदर, राणी महाल,खासबाग, अष्टप्रधानांचे वाडे, मेणा दरवाजा, पालखी दरवाजा, टकमक टोक, जगदीश्वर मंदिर, शिवाजी महाराज समाधी, वाघ्या कुत्र्याची समाधी, तसेच जिजामातांची पाचाड गावामधील समाधी या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत. यावेळी जेष्ठांनी मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)