वीरभद्र यांच्या ‘या’ घोषणेमुळे कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता

सिमला-हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याच्या घोषणेमुळे प्रदेश कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कॉंग्रेस सत्तेवर असणाऱ्या त्या राज्यात काही महिन्यांत निवडणूक होणार आहे. मात्र, वीरभद्र आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सिंह यांच्यातील मतभेद उफाळून आले आहेत.

यापार्श्‍वभूमीवर, नुकत्याच झालेल्या कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत वीरभद्र यांनी धक्कादायक घोषणा केली. त्यानंतर दोन मंत्र्यांनी केवळ वीरभद्र यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ, असे म्हटल्याने कॉंग्रेसच्या गोटात आणखीच खळबळ माजली. या घडामोडींची दखल घेऊन कॉंग्रेस श्रेष्ठींनी वीरभद्र यांना चर्चेसाठी बोलावले आहे. त्यासाठी ते लवकरच दिल्लीचा दौरा करणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)