वीज वितरण कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनास प्रतिसाद

कराड – वीज वितरण कंपनीतील विविध सहा कर्मचारी व अभियंत्यांच्या संघटनांच्या कृती समितीने सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता त्या संपास पाठिंबा देत कराड येथील वीज वितरण संघटनांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी कामबंद आंदोलन केले.

यावेळी संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांनी मागणीचे निवेदन वीज पारेषणच्या अधिकाऱ्यांना दिले. व मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी मागणीही केली. यावेळी राम चव्हाण, बाबासाहेब पवार, शौकत शेख, तुषार खराडे, सचिन माळी, श्रीरंग शिंदे, सारंग सुतार आदींसह पदाधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे महावितरण कंपनीतील प्रस्तावित पुनर्रचना संघटनांनी सुचविलेल्या सूचनांचा अंतर्भाव करून करावी, कर्मचारी वर्ग सेटअप करताना आधिची मंजूर पदे कमी करू नये. जेणेकरून कोणताही कर्मचारी दुखावला जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्याजागी नवीन अंमलात आणावी, महावितरण कंपनीच्या खासगीकरणाचा घाट थांबवावा, अशा मागण्या केलेल्या आहेत. या संपांत कराडसह विभागातील विविध वीज वितरणच्या संघटनांतील प्रतिनिधी, सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)