वीज वितरण कंपनीचा रात्र पाळीचा कर्मचारी ऑन ड्यूटी झोपेत 

त्रस्त नागरिकाचा विचित्र अनुभव 

संगमनेर: खंडित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या शहरातील कुरणरोड येथील नागरिकास शनिवारी रात्री वीजवितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा विचित्र अनुभव आला. खंडित वीज पुरवठ्याची माहिती देण्यासाठी या नागरिकाने तक्रार कक्षाच्या दूरध्वनीवर वारंवार संपर्क करूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. समक्ष भेट दिली असता रात्रपाळी मध्ये काम करत असलेल्या हा कर्मचारी चक्क रिसिव्हर बाजूला ठेऊन ढाराढूर झोल्याचे निदर्शनास आले.

-Ads-

शनिवारी रात्री दीड वाजता शहरातील अनेक भागात अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. कुरणरोड परिसरातील वीज गायब झाली. प्रचंड उष्णता आणि डासांचा त्रास यामुळे अनेक नागरिक त्रस्त झाले. या परिसरात राहणारे जागृत नागरिक मोहसीन रशीद शेख याने त्वरित वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तक्रार कक्षातील २२५९२५ हा क्रमांक बंद लागत होता. तब्बल दीड तास फोन लाऊन उत्तर न मिळाल्याने वैतागलेल्या मोहसीन याने रात्री तीन वाजता थेड वीजवितरण कंपनीचे कार्यालय गाठले. या ठिकाणचे चित्र पाहून तो थक्क झाला.

नागरिकांच्या तक्रारी साठी ठेवण्यात आलेल्या फोन वरील रिसीव्हर बाजूला ठेऊन सबंधित कर्मचारी झोपलेल्या अवस्तेत आढळला. आपत्कालीन परस्तीतीत नागरिकांची गैरसोय होऊनये म्हणून या दूरध्वनीची सुविधा करण्यात आली आहे. मात्र रात्री अनेकदा हा फोन बंद अवस्तेत असतो. नागरिकांच्या तक्रारी ऐकून न घेण्यासाठी व आपली झोपमोड होऊ नये यासाठी कर्मचारी हा फोन बंद ठेवतात असा अनुभव यापूर्वी अनेकांना आला आहे. यामुळे याठिकाणी आंदोलनेही करण्यात आली आहे. वीजवितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन नागरिकाची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनमधून होत आहे.

दरम्यान स्वताला आलेला अनुभव आणि झोपलेल्या कर्मचार्याचा फोटो मोहसीन शेख याने सोशलमिडीयावर टाकल्याने नागरिकांनी या कारभाराचा निषेद व्यक्त केला आहे.

 नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी हा दूरध्वनी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सबंधित प्रकारांची शहानिशा करून सबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करू.

 विश्वजित मोडक, सहाय्यक अभियंता संगमनेर शहर

प्रतिष्ठीत नागरिक थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करतात. सामान्य माणसाला हे शक्य नसत. तक्रारी ऐकून घेण्यासाठी उपलब्ध असलेला दूरध्वन बंद असेल तर सामान्यांनी तक्रार कोणाकडे करायची. संबंधितांनवर कारवाही झाली पाहिजे.  

मोहसीन शेख, त्रस्त नागरिक

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)