वीज वितरणविरोधात नागरिकांमध्ये संताप

शाहबाग फाटा ते वाठारफाटा दरम्यान वाकलेले खांब काढण्याची मागणी

ओझर्डे – शाहबाग फाटा ते वाठार फाटा या 2 किमीच्या अंतरावरील वीज वितरणाच्या भोंगळ कारभाराबाबत संताप वक्त होत आहे असून कामाचा निपटारा करा, अन्यथा उद्रेकाला सामोरे जा, असा इशारा परिसरातील शेतकरी वीजग्राहकानी दिला आहे. या रहदारीच्या रस्त्याच्या बाजूला विद्युत खांब पूर्णपणे रस्त्याच्या बाजूला वाकलेला असून तारा लोंबकळत आहेत. यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

या परिसरातील महावितरणने अनेक दिवसांपासून भोंगळ कारभार चालवला असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसलळी आहे. शाहबाग फाटा ते वाठार फाटा रस्त्यावर कायम वाहनांची रहदारी चालू असते. या भोंगळ कारभारामुळे मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण खेडेगावातील लोकांना वाई शहरात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावरून जाण्यासाठी परिसरातील अनेक गावांचा हा रहदारीचा रस्ता आहे.

अशा ठिकाणी वाकलेला खांब व लोंबकळणाऱ्या तारा यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात वारंवार हेलपाटे मारूनही संबंधित विभागातील अधिकारी दुर्लक्षित करत आहेत. यावर तात्काळ उपाय योजना न झाल्यास परिसरातील शेतकरी आंदोलन करण्याच्या मार्गावर आहेत. या शिवरातून शेतातून जाणाऱ्या विद्युत वाहिनीच्या तारा लोंबकळत असल्याने परिसरातून ये-जा करणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी गावाच्या अन्य भागातील अशा विद्युतवाहिन्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन दुर्घटना घडल्या आहेत.

यात ऊसासह पिकांचे जळून लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. वारंवार हेलपाटे मारूनही येथील कार्यालय प्रमुख व अधिकारी उपलबध नसतात. यामुळे दाद कोणाकडे मागायची असा सवाल उपस्थित होत आहे. भविष्यात दुर्दैवाने या ठिकाणी दुर्घटना घडली तर जबाबदार वीज वितरणाचे कर्मचारी असणार आहेत, असे सांगून येथील शेतकरी संतप्त असून आक्रमक बनले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)