वीज वाहक तारा अडकल्या झाडांच्या फांद्यांमध्ये

सावळ- येथील बालगुडेवस्ती ते सावळ रस्त्याच्याकडेला असलेल्या विद्युत खांबाच्या तारा वीज वितरण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे लोंबकळत असून काही ठिकाणी झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांसह प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने वीज वितरणाने वर कराव्यात तसेच झाडांच्या फांद्यांतोडून विजवाहक तारा मोकळ्या कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. विद्युत वाहक तारा या झाडांच्या विळख्यात सापडलेल्या आहेत. या तारा अनेकवेळा एकमेकांच्या घर्षणामुळे विजेच्या ठिणग्यापडून झाडांना आग लागण्याची शक्‍यता आहे. बालगुडेवस्ती परिसरात अनेक ठिकाणी विद्युतवाहक तारा झाडांवर अडकलेल्या आहेत. या परिसरात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात देखील बाभळीच्या झाडामध्ये या विद्युतवाहक तारा अडकलेल्या आढळतात. पावसाळ्यात कित्येकवेळा विजेचा प्रवाह झाडांवर उतरतो, त्यामुळे शाळेच्या लहान मुलांसाठी ही अत्यंत धोकादायक बाब आहे. या गोष्टीकडे महावितरणचे दर्लक्ष होत असून याची त्वरीत दखल घेऊन शाळकरी मुलांच्या आणि नागरिकांच्या जीवितास असणारा धोका योग्य वेळेत ओळखून होणारा अनर्थ टाळावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)