वीज मीटर देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार

पिंपरी – निगडी प्राधिकरण सेक्‍टर क्रमांक 22 मधील झोपडपट्टीचे पुनर्वसन पुनर्वसन प्रकल्पात वीज मीटर देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार भाजयुमोचे शहर चिटणीस राहूल शिंदे यांनी केली आहे.

यासंदर्भात शिंदे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सेक्‍टर क्रमांक 22 मधील झोपडपट्टीचे पुनर्वसन झाले. मात्र, येथील कुटुंबियांना अद्याप वीज जोड दिले नाही. त्यामुळे ते बेकायदेशीर विद्युत जोड घेत आहेत. मागेल त्याला वीज जोड देऊन हा प्रश्‍न सोडवावा.

या भागात एमएसईबीचे लाल रंगाचे डीपी आहेत. त्याचे दरवाजे तुटलेले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्याद्वारे वीज चोरीचा प्रकार घडत आहे. हा प्रकार रोखण्यासाठी त्वरीत दुरूस्ती करावी. जुन्या गाळाधारकाने थकविलेले वीज बील नवीन ग्राहकाला द्यावे लागते. त्यामुळे नवीन ग्राहकाकडून नवीन मिटरची मागणी होत आहे. त्यांना नवीन मिटर देण्यात यावे. वीज चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी राहूल शिंदे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)