वीज मीटर टंचाईचे आरोप चुकीचे

पिंपरी – महावितरणकडे मागणी असलेल्या तुलनेत वीज मीटर कमी प्रमाणात असले तरी मागणीनुसार उपलब्ध होत असल्याचा दावा महावितरणच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाने केला आहे. येत्या 15 सप्टेंबरनंतर पुरेशा प्रमाणात वीज मीटर राज्यभरात उपलब्ध होणार असल्याचे महावितरणने म्हटले आहे.

वीज मीटरचा तुटवडा असल्याप्रकरणी जिल्हा विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य संतोष सौंदणकर व इतर सदस्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले होते. हे आरोप चुकीचे व बिनबुडाचे असल्याचे महावितरण कार्यालयाचे म्हणणे आहे. सिंगल फेजचे वीज मीटर हे मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र वीज मीटर उपलब्धच नाही, असेही नाही. ही स्थिती राज्यभरात आहे. येत्या 15 सप्टेंबरनंतर पुरेशा प्रमाणात वीज मीटर राज्यभरात उपलब्ध होणार आहेत.

ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी उपलब्ध वीज मीटरची माहिती वेळोवेळी प्रसिध्द केली जात आहे. परिमंडल अंतर्गत होत असलेल्या निविदा प्रक्रिया नियमानुसार होत असून त्यामध्ये प्रादेशिक कार्यालयाकडून कोणताही हस्तक्षेप होत नाही. देहूरोड येथील इंद्रायणी स्विचिंग स्टेशनच्या कामांबाबत झालेल्या तक्रारीची शहानिशा करून पुढील सर्व कामे योग्य प्रकारे करण्यात आली आहेत. तसेच स्विचिंग स्टेशन व अन्य विकास कामांच्या उद्‌घाटनाच्या कार्यवाहीमध्ये प्रादेशिक कार्यालयाची कोणतीही भूमिका नाही. त्यामुळे इंद्रायणी स्विचिंग स्टेशनचे उद्‌घाटन परस्पर उरकून टाकण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. आकसातून केले जाणारे आरोप चुकीचे व बिनबुडाचे आहेत, असल्याचा दावा महावितरण प्रशासनाने केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)