वीज भारनियमनात लवकरच तोडगा पंकजा मुंडे यांनी केली उर्जामंत्र्यांशी चर्चा 

परळी: अचानक सुरू झालेल्या वीज भारनियमनासंदर्भात राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली असून लवकरच यात तोडगा निघणार असल्याचे नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांनी येथे सांगितले.
एकीकडे जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असतानाच दुसरीकडे महावितरण कंपनीने संपूर्ण जिल्हाभरात पुन्हा भारनियमन सुरू केले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली उन्हाची तीव्रता, त्यातच सोमवार पासून सुरू झालेले भारनियमन यामुळे नागरिक चांगलेच मेटाकुटीला येताना दिसत आहेत. तर दुसरीकडे सुरू होत असलेल्या नवरात्र उत्सवावर या भारनियमनामुळे अंधकाराचे सावट उभे ठाकले आहे.
ग्रामीण भागाला या भारनियमनाचा सर्वाधिक फटका बसला असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अचानक सुरू झालेल्या या भारनियमनाची माहिती पंकजा मुंडे यांना दिल्यानंतर त्यांनी लगेचच उर्जामंत्र्यांशी चर्चा करून भारनियमन रद्द किंवा ते कमी करावे यासाठी संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत अशा सूचना केल्या आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)