वीज दरवाढी विरोधात वीजबीलांची होळी 

लघुउद्योग संघटनेचे महावितरणसमोर आंदोलन
पिंपरी: महावितरणने प्रस्तावित वीज दरवाढ त्वरित मागे घ्यावी, या मागणीसाठी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि.7) महावितरणच्या भोसरी विभागीय कार्यालयासमोर पिंपरी चिंचवड लघुउदयोग संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. प्रवेशद्वारासमोर झालेल्या आंदोलनात वीज बिलांची होळी करण्यात आली. यावेळी जयंत कड, प्रमोद राणे, निस्सार सुतार, संजय सातव, संजय ववले, विनोद नाणेकर, नितीन बनकर, प्रविण लोंढे, हर्षल थोरवे, संजय आहेर, दिपक फल्ले, दिपक मोडवे, शिवाजी साखरे आदींसह शेकडो लघुउद्योजक उपस्थित होते.
महावितरणने 8 पैशांने दाखवलेली वीज दरवाढ फसवी आहे. स्थिर आकार वहन आकार, इंधन समायोजन याचा परिणाम वीजदर वाढीवर एकत्रित होत असतो त्यामुळे औद्योगिक ग्राहकाला याचा मोठा फटका बसणार आहे. उच्चदाब व लघुदाब औद्योगिक ग्राहकांच्या वीज आकारात 2 टक्के वाढ केल्याचे दिसत असले तरी स्थिर आकाराच्या वाढीमुळे या ग्राहकाला अनुक्रमे 18.4 आणि 16 टक्के दरवाढ होणार आहे. मुक्त प्रवेश पद्धतीने राज्यातील उद्योजकांनी बाहेरून वीज घेतली, त्यामुळे महावितरणची औद्योगिक वीज विक्री कमी झाली आहे ही वस्तुस्थिती आहे.
आठ वर्षांपूर्वी महावितरणची औद्योगिक वीज विक्री 25000 दशलक्ष युनिट हून अधिक होती 8 वर्षात 40 %वाढ व्हायला हवी होती. प्रत्यक्षात आता ही विक्री 23000 दश लक्ष युनिट खाली आली आहे. त्यामुले स्पर्धात्मक राष्ट्रीय व जागतिक बाजार पेठेत टिकण्यासाठी उद्योगांनी कायदेशीर उपलब्ध मार्गाचा वापर केला आहे. महावितरणची वीज स्वस्त व स्पर्धात्मक दरात नव्हे तर 10 % महाग असेल तरी घेऊ ही सर्वसाधारण उद्योजकांची भावना व भूमिका आहे. प्रस्तावानुसार औद्योगिक वीजदर शेजारील राज्याच्या तुलनेत किमान 40% ते 50% जास्त व देशात सर्वाधिक होणार आहेत. शेती पंपाचा वीज पुरवठा दुप्पट दाखवून ही गळती लपवली जाते व भ्रष्टाचाराला संरक्षण दिले जाते गळती 15 % दाखवली जाते प्रत्यक्षात गळती 30% पेक्षा जास्त आहे.
ही वीज दरवाढ उद्योग क्षेत्राचे आर्थिक गणित बिघडविणारी असुन लघु उद्योगावर याचा मोठा परिणाम होणार आहे. पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात गेले महिनाभर रोज 4 ते 5 तास वीज गायब असते अनेक तक्रारी करून ही महावितरणच्या खालपासून वर पर्यंतच्या अधिकाऱ्यांना लक्ष देण्यास वेळ नाही, पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात पायाभूत सुविधाचे जाळे जुने झाले असून ते बदलण्याकडे महावितरण लक्ष देत नाही.
अपुरा कर्मचारी वर्ग, अपुरा साहित्य पुरवठा, धोकादायक ओवर हेड वायर, औद्योगिक ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यापेक्षा वीजदरवाढी मध्येच महावितरणला स्वारस्य असून सत्यशोधन समिती व आयआयटी मुंबई यांचा अहवाल आल्यानंतर फेर आढावा याचिकेच्या तपासणीच्या वेळी खरा वीज वापर जाहीर करावा. मगच आयोगाने वीज दरवाढीचा निर्णय घेण्यात यावा. तसेच प्रस्तावित वीज दरवाढ त्वरित मागे न घेतल्यास पुढील कालावधीत आंदोलन आणखी तीव्र करु. वेळप्रंसगी काम बंद करु असा इशारा पिंपरी चिंचवड लघुउदयोग संघटनेने दिलाआहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)