वीज दरवाढीविरुद्ध न्यायालयात जाणार

Electricity

वीज ग्राहक संघटनेचा इशारा

पुणे – वीज दरवाढीची घोषणा करताना महावितरण प्रशासनाने खोटी आकडेवारी देऊन राज्यभरातील सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांची शुुद्ध फसवणूक केली आहे. प्रत्यक्षात ही वीज दरवाढ 6 नव्हे, तर 15 टक्के करण्यात आली आहे. राज्य शासन, राज्य वीज नियामक आयोग आणि महावितरण प्रशासन यांची त्यासाठी मिलिभगत आहे, असा आरोप राज्य वीज ग्राहक संघटनेने केला आहे. या अन्यायकारक दरवाढीच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

वाढती तूट कमी करण्यासाठी महावितरण प्रशासनाच्या वतीने राज्य वीज नियामक आयोगाला वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, त्यावर ग्राहक आणि महावितरण प्रशासनाचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आयोगाच्या वतीने राज्यभर सुनावणी घेण्यात आल्या. त्यानंतर आयोगाच्या वतीने काल या नव्या प्रस्तावित वीज दरवाढीची घोषणा करण्यात आली. त्यावर राज्य वीज ग्राहक संघटनेच्या वतीने तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली; त्यासंदर्भात दैनिक “प्रभात’ शी बोलताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव होगाडे यांनी आयोगासह महावितरण प्रशासन तसेच राज्य शासनावर जोरदार टीकास्र सोडले.

राज्य वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीच्या संदर्भात जाहीर केलेली आकडेवारीच फसवी आहे असा आरोप करुन होगाडे म्हणाले, आकड्यांचा फसवा खेळ करुन आयोगाने ही दरवाढ सर्वसामान्य जनतेवर लादली असून त्याचा सर्वाधिक फटका हा औद्योगिक आणि शेतीपंपाच्या ग्राहकांना बसणार आहे. या अन्यायकारक दरवाढीमुळे राज्यातील शेती आणि उद्योगही धोक्‍यात येणार आहेत.

राज्य नियामक आयोग, महावितरण प्रशासन आणि राज्य शासन यांनी संगनमत करुन सर्वसामान्य ग्राहकांवर ही अन्यायकारक दरवाढ लादली आहे. ही दरवाढ केवळ सहा टक्के असल्याचा दावा महावितरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र; त्याची आकडेवारी पाहिली तर या त्रिकुटांनी सर्वसामान्य ग्राहकांवर तब्बल 12 हजार 382 कोटी रुपयांची दरवाढ लादली आहे. ही दरवाढ अन्यायकारक अशीच आहे, त्यामुळे या दरवाढीच्या संदर्भात यापुढील कालावधीत राज्य वीज नियामक आयोगाकडे दाद मागण्यात येणार नाही. तर या दरवाढीच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे, असा इशाराही होगाडे यांनी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)