वीज दरवाढीचा शॉक

Electricity

पुणे- उकाड्याने हैराण असलेल्या राज्यातील वीज ग्राहकांना महावितरण प्रशासनाने आणखी एक झटका दिला आहे. येत्या एक एप्रिलपासून घरगुती आणि कृषीपंपासाठी लागणाऱ्या वीज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्यांवर मोठा अर्थिक बोजा पडणार आहे.

महावितरणच्यावतीने वीज दरवाढीसाठी राज्य वीज नियमाक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती. त्याला परवानगी दिल्याचे समजते. प्रत्यक्षात 2020 पर्यंत चार टप्यात वीज दरवाढ करण्याची परवानगी आयोगाने महावितरणला दिली आहे. त्यानुसार 2018 मधील दरवाढ करण्यात आली आहे. या वीज दरवाढीमुळे घरगुती वीज ग्राहकांबरोबर कृषी, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पॉवरलूम पथदिवे यांना फटका बसणार आहे. सर्वातजास्त दरवाढ ही कृषी क्षेत्रात असून वाणिज्य आणि औद्योगिक क्षेत्रातील वीज ग्राहकांचे दर थोडे कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई वगळता राज्यातील इतर भागांतील वीज ग्राहकांना हा दरवाढीचा फटका बसणार आहे.

तिसऱ्या टप्प्यातील ही दरवाढ 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. नवीन दरानुसार मीटर नसलेल्या पाच एचपी पंपापर्यंतच्या कृषी ग्राहकांना प्रती युनिट 22 पैसे, पाच ते सात एचपीचे पंप असणाऱ्या ग्राहकांना 21 पैसे तर 7.5 एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या पंपासाठी 16 पैसे प्रती युनिट जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. घरगुती ग्राहकांसाठी ही दरवाढ प्रती युनिट दोन ते पाच पैसे असेल. वाणिज्यीक व औद्योगिक ग्राहकांचा वहन शुल्क कमी होणार असल्याने या ग्राहकांचे देयक कमी येईल, तर सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे, तात्पुरता पुरवठा, पावरलूमसाठी विजेचे दर प्रति युनिट 13 पैशापर्यंत वाढेल.

महावितरण कंपनीच्या म्हणण्यानुसार ही दरवाढ किरकोळ स्वरुपाची असून या दरवाढीमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांना फारसा फटका बसणार नाही. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांचे दर कमी करण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)