वीज चोरीप्रकरणी व्यापाऱ्यावर गुन्हा

पिंपरी – 12 हजार 758 युनिटची वीज चोरी करणाऱ्या व्यापाऱ्याविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही वीज चोरी 2016 ते 2018 या दोन वर्षाचा कालावधीत झाली.

याप्रकरणी महावितरणचे अतिरिक्‍त अभियंता नरेंद्र भागवत रडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात वीज ग्राहक मेसर्स डी. डी. एन्टरप्रायजेस धनंजय सुरेश पडवळ याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडवळ यांनी 2016 ते 12 सप्टेंबर 2018 या कालावधीत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी 12 हजार 758 युनिटची वीज चोरी केली आहे. त्यामुळे महापालिकेचे 1 लाख 26 हजार 350 रुपयांचे आहे. मात्र संबंधित भागात पुरवली जाणारी वीज ही 27 एचपी भार असल्यामुळे त्याची तडजोड रक्कम ही 2 लाख 70 हजार रुपये एवढी आहे. त्यामुळे भारतीय विद्युत कायदा कलम 135 प्रमाणे पडवळ यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. वाय. पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)