वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू

कर्जत – कर्जत तालुक्‍यातील खांडवी येथील पोपट देविदास तापकीर (वय 45) यांचा वीज अंगावर पडुन मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
तालुक्‍यातील खांडवी – कोंभळी परिसरात मंगळवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस सुरू होता. दरम्यान मोठ्या प्रमाणावर वादळ झाले.तापकीर हे शेतामध्ये काम करीत होते. अचानक त्यांच्या अंगावर विज कोसळली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.त्यांच्या पश्‍चात पत्नी, वडील, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्घटनेमुळे तापकीर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कर्जत तालुक्‍यात सलग दुसऱ्या दिवशी वीज अंगावर पडून शेतकऱ्याला जीव गमवावा लागला.सोमवारीच राशीन जवळच्या मोहिते वस्ती येथील महिलेचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला होता.सलग दुसऱ्या दिवशी वीज अंगावर पडून झालेल्या दुर्घटनांमुळे कर्जतकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)