वीजवितरणची कामे पावसाळ्यापूर्वी करा

चिंबळी-खेड तालुक्‍यात दक्षिण भागातील विविध गावच्या वीज पुरवठ्याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ, शेतकरीवर्ग हैराण झाले आहे.
पावसाळा सुरू होण्याअगोदरच महावितरण कंपनीने खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील कुरूळी चिंबळी, मोई, निघोजे, माजगाव परिसरातील विविध ठिकाणी खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा. तसेच फ्युजपेट्यांची दुरूस्ती करावी व ट्रान्सफार्मरच्या आजूबाजूच्या झाडाची तोडणी करण्यात यावी तसेच आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करावी वीजतारांना घसरण होणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडण्यात याव्यात, फ्युज पेट्यांना दरवाजे बसवावेत, अशी मागणी या परिसरात वारंवार केली जात असूनही वीजवितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने या भागात आकडे टाकून चोरून वीज वापरण्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चिंबळी, कुरूळी परिसरात दररोज रात्री व सकाळी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. कुरूळी, मोई रस्त्यावर मुऱ्हेवस्ती येथे वीजवितरण कंपनीच्या वतीने बसविण्यात आलेल्या ट्रान्सफार्मरवर चारही बाजूंनी झाडाझुडपांनी वेढले असल्याने ट्रान्सफार्मर व फ्युजपेटी आहे की नाही, हेच कळत नाही. तरी देखील वीजवितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने कंपनी चालकांचे व शेतकरीवर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)