वीजपुरवठा, तक्रार निवारण करणे अधिकाऱ्यांचे कर्तव्य

राहुरी – ग्राहकांना पुरेशा दाबाने वीजपुरवठा करणे, तक्रारींचे निवारण करणे हे महावितरण अधिकारी आणि कर्मचारी यांचे कर्तव्य आहे, असेप्रतिपादन महावितरणचे कार्यकारी अभियंता शरद बंड यांनी केले. येथे तक्रार निवारण आणि संवाद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तेबोलत होते. बंड म्हणाले, तक्रार निवारणासाठी महिन्याच्या प्रत्येक प्रथम सोमवारी शाखा कार्यालय स्तर आणि चौथ्या सोमवारी उपविभागीय स्तरावर ग्राहक तक्रार निवारण, संवाद दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. महावितरणचेअधीक्षक अभियंता अनिल बोरसे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे, उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, राहुरीचे उपकार्यकारी अभियंता धीरज गायकवाड, उपअभियंता गावले, चौधरी, मुरकुटे, गांगुर्डेयावेळी उपस्थित होते. यावेळी वीजबिल, नवीन वीज जोडणी, नाव बदल, वीजपुरवठा याबाबतच्या 120 ग्राहकांच्या तक्रारी निकाली काढण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)