वीजचोरी प्रकरणी कर्जतमध्ये 43 जणांवर कारवाई

नगर- महावितरणच्या कर्जत उपविभागांतर्गत 43 जणांविरुद्ध वीजचोरी प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. कर्जतमध्ये नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून वीजचोरी विरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
जनवीर यांनी नुकताच कर्जतचा दौरा करून विभागाचा आढावा घेतला. यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी अखंडित वीज पुरवठा, मीटरचे अचूक रिडींग व त्यानुसार बिल, या विजबिलाची शंभर टक्के वसुली, थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच वीजचोरी विरोधात विभागात विशेष मोहीम राबवून धडक कारवाई करण्याबाबत त्यांनी सूचित केले. या कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. बैठकीनंतर मुख्य अभियंत्यांच्या उपस्थितीत बहिरोबावाडी व परिसरात पाहणी केली असता 43 ठिकाणी आकडे टाकून वीजचोरी होत असल्याचे आढळून आले.
संबंधितांना वीज कायदा-2003 च्या कलम 135 नुसार जवळपास अडीच लाख रुपयांचे वीजबिल देण्यात आले असून या बिलाचा तातडीने भरणा करण्याचे सूचित करण्यात आले आहे. हे बिल न भरल्यास त्यांच्या विरोधात पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असून अधिकृत जोडणी घेऊनच वीजवापर करावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता प्रशांत मासाळ यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)