वीजचोरी करणाऱ्यांविरोधात 1 सप्टेंबरपासून विशेष मोहीम

मुंबई – रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरोधात राज्यभरात महावितरणच्या वतीने 1 सप्टेंबरपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यात संबंधित ग्राहकांसह रिमोटची निर्मिती करणाऱ्या कंपनी विरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

महावितरणच्या वतीने वीजचोरीवर आळा घालण्यासाठी सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येतात. वीजचोरी रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात विशेष मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते. परंतू अलीकडच्या काही वर्षात रिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत मुंबईत आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अशा वीजचोरीच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्याचा व कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांनी महावितरणला त्याची माहिती द्यावी. अशा वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या अनुमानित रक्कमेच्या 10 टक्के रक्कम रोख स्वरुपात बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. तसेच अशी माहिती देणाऱ्याचे नाव देखील गुप्त ठेवण्यात येईल. त्यामुळे अशा वीजचोरीची माहिती देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)