वीजग्राहकांना मायमराठीतून “एसएमएस’

पुणे परिमंडलातील 26 लाख ग्राहकांना सेवा : मोबाईलधारक लाभार्थी

पुणे – वीजबिलांचा तपशील व मीटर रिडींगसह इतर माहिती वीजग्राहकांच्या मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे महावितरणकडून पाठविण्यात येत आहे. पुणे परिमंडलातील मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या 26 लाख 25 हजार वीजग्राहकांना ही सेवा सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वीजग्राहकांच्या मागणीनुसार मराठी भाषेतून सुद्धा “एसएमएस’ उपलब्ध आहे.

पुणे परिमंडलात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिकसह इतर वर्गवारीत 27 लाख 24 हजार वीजग्राहक आहेत. त्यापैकी 25 लाख 26 हजार वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केलेली आहे. तसेच 1 लाख 14 हजारांपैकी 98,404 कृषीपंपधारकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली आहे. सद्यस्थितीत “एसएमएस’द्वारे ग्राहक क्रमांक व बिलाची रक्‍कम, देय दिनांक आदींचा तपशील, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व एकूण युनिटचा वापर तसेच तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठ्याचा कालावधी वीजग्राहकांना “एसएमएस’द्वारे कळविण्यात येत आहे. यासोबतच “एसएमएस’द्वारे मिळालेल्या वीजबिलाच्या तपशिलावरून वीजग्राहकांना देयकाचा भरणा करणे शक्‍य झाले आहे. महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रात “एसएमएस’ दाखवून वीजबिलाचा भरणा करण्याची सोय उपलब्ध झालेली आहे.

महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर “एसएमएस’द्वारे वीजग्राहकांना स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर (स्पेस) (बारा अंकी ग्राहक क्रमांक), अशी माहिती टाईप करून “एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24 तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. पुणे परिमंडलातील सर्व वर्गवारीतील ज्या वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे नोंदणी केलेली नाही. त्यांनी नोंदणी करण्यास सहकार्य करावे व ग्राहकसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)